स्मार्ट टिप्स : ‘थंडा करके खाओ!’
sakal_logo

द्वारे

श्रीनिवास जाखोटिया

शेअर बाजारात मागील महिन्याभरात बऱ्यापैकी नफेखोरी दिसून आली आणि त्यामुळे घसरण पाहायला मिळाली. उच्चांकी पातळीपासून हा बाजार जवळपास ५२०० अंशांनी म्हणजेच ८.५ टक्क्यांनी खाली आला आहे. परंतु, बाजारात दीर्घकालीन तेजीसाठी अशा प्रकारच्या नफेखोरीमुळे होणारी घसरण म्हणजे गुंतवणुकीची संधीच मानली पाहिजे.

हेही वाचा: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला

मागील वर्षी आलेल्या मोठ्या मंदीत अनेक नवगुंतवणूकदार बाजारात प्रथमच आले. त्यांनी बाजारात केवळ तेजीच पाहिली होती. त्यांना या बाजारात सहजपणे नफा मिळवता येतो, असे वाटत होते. असे अनेक नवगुंतवणूकदार या पडझडीमुळे अडचणीत येऊ शकतात. त्यांनी बाजारात केवळ तेजी गृहीत न धरता, मंदीची शक्यता गृहीत धरून अशा मंदीत शेअर विकण्याऐवजी ते घेण्यासाठी आर्थिक तयारी करून ठेवावी. पुढे देखील तेजीमध्ये, वाढत्या बाजारामागे अंधपणे पळत जाण्याऐवजी ‘थंडा करके खाओ’ ही नीती वापरावी व कोणत्याही चढ्या भावात शेअर घेण्याऐवजी योग्य वेळेची व संधीची वाट पाहून तशी तयारी ठेवावी. खरेदी वेगवेगळ्या टप्प्यांत करावी व सर्व शेअर एकदम खरेदी करणे टाळावे.

– रितेश मुथियान

(लेखकद्वय शेअर बाजारातील गुंतवणुकीचे जाणकार आहेत.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here