त्रिपुरा

पहिल्यांदाच त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलेल्या तृणमूलला एका जागेवर समाधान मानावे लागलेय.

sakal_logo

द्वारे

टीम ई-सकाळ

आगरतळा : त्रिपुरातील कथित घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे महाराष्ट्रातील अमरावती (Amravati), नांदेड आणि मालेगाव या शहरात दंगली उसळल्या होत्या. त्याच त्रिपुरात (Tripura) झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल (Local body Election) नुकताच लागला असून यात भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. डाव्या पक्षांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं (BJP) आपलं स्थान आणखी मजबूत केलंय. डाव्यांसह तृणमूल काँग्रेसशी लढताना भाजपनं 334 पैकी 329 जागा काबीज केल्या आहेत. त्यापैकी तब्बल 112 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळं त्रिपुरात भाजपनं मोठा इतिहास रचलाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आगरतळा महापालिकेतील सर्वच्या सर्व ५१ वॉर्डांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसह तृणमूल व डाव्यांनाही इथं खातंही उघडता आलं नाही. अगरतळासह सहा नगर पंचायत आणि १३ नगर परिषदांमध्येही भाजपचाच डंका आहे. डाव्यांना केवळ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही, त्यामुळं इथं काँग्रेसची निराशा झालीय.

हेही वाचा: ‘भाजपकडून मला आमदारकीसाठी तिकीट देण्याची ऑफर’

तर, पहिल्यांदाच त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलेल्या तृणमूलला एका जागेवर समाधान मानावे लागलेय. त्यामुळं भाजपच्या विजयी उमेदवारांचा आकडा ३३४ पैकी ३२९ एवढा झाला आहे. २०१८ मध्ये राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे गेले आहे. त्यामुळं २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याचे बोलले जात होते. त्यामुळं भाजपसाठी हा निकाल दिलासादायक आहे, हे मात्र नक्की!

हेही वाचा: आमदार गोरेंनी गद्दारी करत काँग्रेस पक्ष सोडला : रणजितसिंह देशमुखEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here