
5 तासांपूर्वी
विटा : आम्ही चांगल्याला विरोध करत नाही. विरोधक रस्त्याच्या कामात आडवे पडले. रस्ते दर्जेदार व गुणवत्तेचे व्हावेत, यासाठी सार्वजनिक बांधकामकडे निधी दिला आहे. काहींना संभ्रम निर्माण करण्याची सवय असते. पालिका आमच्या ताब्यात नको, पण ती सामान्यांची झाली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरासाठी मंजूर झालेल्या १७ कोटींच्या रस्तेकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
नगरसेवक अमोल बाबर म्हणाले, ‘विटा पालिकेच्या इतिहासात कधीही १७ कोटीचा निधी मिळाला नाही तो भाऊंनी आणला. विरोधकांनी दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. बळी पडू नका. कोणत्याही वार्डात लढण्याची माझी तयारी आहे. मात्र पालिकेत परिवर्तन करू. ते म्हणाले, ‘पुढची तीन वर्षे सरकार आपले आहे. विकासकामांना निधी मिळण्यात अडचण नाही. पालिका निवडणुकीत कार्यकर्ते व मतदारांनी शिवसेनेमागे ताकदीने उभा रहावे.’
हेही वाचा: ‘मदत घेताना आमचा पक्ष अरुण लाड यांना नासका, कुजका वाटला नाही का?’
सुहास बाबर म्हणाले, ‘भाऊंनी ४० वर्षे लोकांची सेवा करत सकारात्मक भूमिका घेतली. घोगांव योजनेचा पहिला टप्पा व सुधारित नवीन पाणी योजना मंजूर करण्यासाठी भाऊंनी पाठपुरावा केला. योजनांचे श्रेय कोणा एकट्याचे नाही. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पाण्याचा शब्द दिला. तो पुर्ण केला. रस्ते प्रशस्त होतील यात शंका नाही. जनतेच्या स्वाभिमानासाठी पालिका जिंकायची आहे.’ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, संजय भिंगारदेवे, नंदकुमार पाटील, सविता जाधव, विनोद गुळवणी, उत्तम चोथे, सुखदेव शितोळे, रामचंद्र भिंगारदेवे, समीर कदम, राजू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
१३-१२ केले तर बिनविरोध
विरोधकांचे कार्यकर्ते आमच्याजवळ येऊन पुड्या सोडत आहेत. ‘आमच्या १३ आणि तुमच्या १२’ अशी वाटणी होणार असेल तर निवडणूक बिनविरोध करूया, असे प्रस्ताव कार्यकर्ते घेऊन येताहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, ‘आमच्या १३-तुमच्या १२ अशी वाटणी होणार असेल तर पालिकेची निवडणूक बिनविरोध करतो.
हेही वाचा: ठाकरे सरकारची कोलांटउडी! दोन लाखांवरील कर्जमाफी नाहीच
Esakal