
5 तासांपूर्वी
संमेलनाची वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन होत आहे. असाच एक विज्ञानावर आधारित कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या परिसंवादातील एक वक्ता थेट अश्व, मध्य, कलियुगातील विज्ञानाचा इतिहास उलगडून दाखवीत असल्याने परिसंवादामध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी विज्ञानाचा आविष्कार असलेल्या मोबाईलचा आधार घेत अश्वयुगातील विज्ञानाचा इतिहास ऐकण्यास नापसंती दर्शविली.
अश्वयुगातील विज्ञानातील रटाळ झालेल्या व्याख्यानानंतर श्रोत्यांसह पाहुण्यांनी सुस्कारा तर सोडलाच; परंतु पुढील वक्त्याने त्यावर जोरदार टोला हाणत श्रोत्यांची वाह वाह मिळविली. विज्ञानावर आधारित परिसंवादात काहीतरी नवीन ऐकायला मिळेल, या हेतूने आलेल्या श्रोत्यांची मात्र या प्रकारामुळे घोर निराशा झाली. विज्ञानावर परिसंवाद होण्याऐवजी जोरदार भाषणेच अधिक झाली. दुसऱ्या वक्त्याचे रटाळ भाषण बघता आणि श्रोत्यांचा मूड बघून तिसऱ्या वक्त्याने आपले भाषण आटोपते घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी, संमेलन संयोजन समितीने घेतलेल्या या परिसंवादाला झालेली गर्दी पाहता संमेलनाचे संयोजन कुठपर्यंत पोचले आहे, याचा प्रत्यय येत होता.
Esakal