गुड्डु भैय्याच्या बहिणीचा 'बिकीनी अवतार'; Bold फोटो चर्चेत

गुड्डु भैय्याच्या बहिणीचा ‘बिकीनी अवतार’; Bold फोटो चर्चेत

sakal_logo

द्वारे

टीम इ सकाळ

मुंबई – मनोरंजन क्षेत्रामध्ये सध्या ओटीटीनं धुमाकुळ घातला आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीनं अनेकांना भुरळ घातली होती. मनोरंजनाची मोठी जबाबदारी या माध्यमानं पार पाडली होती. मनोरंजन क्षेत्राला उभारी देण्यात महत्वाची भूमिका ओटीटीची होती. वेगवेगळ्या विषयांवरील मालिका, चित्रपट यावेळी ओटीटीवरुन प्रदर्शित झाले होते. मिर्झापूर नावाची मालिकाही ओटीटीवरुन प्रदर्शित झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या मालिकेतील प्रसंग, संवाद, पात्रं त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय होता. सध्या या मालिकेतील गुड्डु भैय्याच्या बहिणीचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिर्झापूर मालिकेला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली होती. त्या मालिकेतील लोकप्रिय पात्र म्हणजे गुड्डु भैय्या. सध्या सोशल मीडियावर गुड्डुच्या बहिणीचा हॉट अवतार सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याला प्रेक्षकांनी दाद दिली आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत. याशिवाय कालीन भैय्याच्या व्यक्तिरेखानं चाहत्यांची पसंती मिळवली होती पंकज त्रिपाठी यांनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्या तोंडी असलेल्या संवादानं चाहत्यांची अमाप लोकप्रियता मिळवली. यासगळ्यात गुड्डुच्या बहिणीनं डिंपीनं लक्ष वेधून घेतलं आहे. मिर्झापूरमध्ये डिंपीची भूमिका हर्षिता कौरनं साकारली होती.

हर्षिताचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिनं बिकीनीमध्ये फोटोशुट केलं आहे. काही दिवसांपूर्वी डिंपीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही बोल्ड फोटो शेय़र केले होते. त्या फोटोंना चाहत्यांकडून हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या होत्या. फोटोंमध्ये हर्षितानं ब्लॅक रंगाची बिकीनी परिधान केली असून तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. हर्षितानं 2013 ते 2016 मध्ये टीव्ही सीरियल सड्डा हकमध्ये संयुक्ता अग्रवालची भूमिका साकारली होती.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here