ओझर विमानतळ
sakal_logo

द्वारे

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: कोरोनाच्या (Corona) ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नव्या व्हेरिएंटने (Variant) जगभरात दहशत निर्माण केली आहे. कुठल्याही विषाणूचे म्युटेशन होते. म्हणजेच परिवर्तनातून नवीन प्रकार तयार होतात. ओमिक्रॉन या असाच तयार झालेला व्हेरिएंट आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच डेल्टा व्हेरिएंटने (Delta variant) भीती निर्माण केली होती. आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जगभरात खबरदारी घेतली जात आहे.

ओमिक्रॉनची दक्षिण आफ्रिकेत उत्पत्ती झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आतापर्यंत मुंबईत ८७ प्रवासी दाखल झाले आहेत. या ८७ जणांना ट्रेस केलं जातंय. अद्याप या ८७ जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप तरी आढळलेला नाही. या ८७ प्रवाशांचा अहवाल आल्यानंतर या बाबत स्पष्टता होणार आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉनचा धोका, मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करुन घेणार निर्णय

दुबईने 13 देशातून येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे, तशाच प्रकारची नियमावली महाराष्ट्र मध्ये देखील असावी, याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here