भारताच्या रुपे कार्डची व्हिसाने केली यूएस सरकारकडे तक्रार

व्हिसाने (Visa)भारताच्या स्वदेशी पेमेंट सर्व्हिस गेटवे रुपे कार्डबाबत (RuPay)यूएस सरकारकडे तक्रार दाखल केली आहे. रुपेच्या प्रमोशनमुळे कंपनीचे खूप नुकसान होत असल्याचे व्हिसाचे म्हणणे आहे.

sakal_logo

द्वारे

शिल्पा गुजर

पेमेंट गेटवे व्हिसाने (Visa) भारताच्या रुपे कार्डबाबत यूएस सरकारकडे तक्रार दाखल केली आहे. भारत आपली पेमेंट सेवा प्रणाली रुपे कार्ड सेवेचा औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने प्रचार करत आहे. यामुळे भारतातील व्हिसा कंपनीचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रॉयर्सच्या अहवालाचा हवाला देत ही माहिती देण्यात आली आहे.

रूपे आणि व्हिसामध्ये खडाजंगी

भारताची स्वदेशी पेमेंट सेवा रुपे कार्ड (RuPay) ही व्हिसाची प्रतिस्पर्धी आहे आणि भारत ही व्हिसासाठीची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच व्हिसासा रुपे कार्डच्या वाढत्या प्रभावाबाबत त्रास होतो आहे. याबाबत व्हिसाने सार्वजनिकरित्या काहीही सांगितले नसले तरीही यूएस सरकारच्या मेमोवरून या तक्रारीची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा: रुपे कार्ड, भीम अॅपद्वारे व्यवहार करणाऱ्यांना GST मध्ये 20% सूट

मास्टरकार्डकडूनही तक्रार

व्हिसा व्यतिरिक्त (Visa) मास्टरकार्डनेही (MasterCard) यूएसटीआरकडे (USTR) तक्रारी केल्या आहेत. कंपनीने USTR कडे विरोध नोंदवला होता की भारताचे पंतप्रधान स्थानिक नेटवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादाचा अवलंब करत असल्याचे रॉयटर्सने 2018 च्या अहवालात म्हटले आहे.

यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) कॅथरीन ताई आणि सीईओ अल्फ्रेड केली यांच्यासह कंपनीचे अधिकारी यांच्यात 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीदरम्यान व्हिसाने भारतातील लेव्हल प्लेइंग फील्डबद्दल चिंता व्यक्त केली.

हेही वाचा: आता भूतानमध्येही चालणार ‘रुपे’ कार्ड

एनसीपीआय (NCPI) ही ना-नफा (Non Profitable) संस्था आहे. ते भारतात रूप कार्ड चालवतात. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी वर्षानुवर्षे रुपे कार्डला प्रोत्साहन दिले आहे, जे व्हिसा आणि मास्टरकार्ड सारख्या कंपन्यांसाठी आव्हान ठरत आहे. नोव्हेंबर 2020 पर्यंत, भारतातील 95.2 कोटी डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सपैकी 63 टक्के वाटा रुपेचा (RuPay) आहे. तर 2017 मध्ये हा वाटा फक्त 15 टक्के होता.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here