भाजप
sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर या निवडणुकीत विजय मिळवणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. कुठलीही जोखीम पत्करायची नेत्यांची इच्छा नाही. त्यामुळे भाजपचे ३३ नगरसेवक रविरात्री रात्री १.३० वाजताच्या विमानाने गोव्याला गेले आहेत. निवडणुकीत मतदार फुटणार नाही, यासाठी भाजपने हा सावध पवित्रा उचलला आहे.

भाजप नेते, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यावर तब्बल दोन वर्षांनंतर त्यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये ज्या नावांची चर्चा होती, त्यामध्ये बावनकुळे यांचे नाव आघाडीवर होते. या निमित्ताने २०१९ नंतर दूर गेलेला मतदारही भाजपला जवळ करायचा आहे. बावनकुळे लढवय्ये आहेत, ते विजयश्री खेचून आणतीलच, असा विश्‍वास नेत्यांना आहे.

हेही वाचा: रात्री उशिरा दोघेही करीत होतो उलट्या; आईच्या लक्षात येईपर्यंत…

टप्प्या-टप्प्याने जवळपास शंभर नगरसेवकांना वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक टीमसाठी एका टीम लिडरची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरा जत्था हा नगरसेविकांचा असणार आहे. त्यांना उत्तराखंड आणि जम्मू काश्‍मीरला पाठविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. महापौरांसह मोजक्या ८ ते १० नगरसेवकांना नागपुरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश आहे. मुख्यत्वे करून नागपुरातील जबाबदारी सांभाळण्यासाठी या लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपसाठी निवडणूक महत्त्वाची

भाजपचे मतदार असूनही तळ्यात मळ्यात भूमिका असलेल्या सदस्यांना पहिल्याच टप्प्यात अज्ञातस्थळी पाठविण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नगरसेविकांना पाठवण्यात येणार आहे. एक-दोन दिवसांतच दुसरा जत्था रवाना होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आणि एकूणच भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here