गुन्हा
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : खारघर (Kharghar) सेक्टर-२१ मधील बन्सल हाऊस येत कामाला असलेल्या एका नेपाळी सुरक्षारक्षक (Nepali security guard) व त्‍याच्या पत्‍नीने (wife) बन्सल हाऊसमध्ये २ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून (property robbery) पलायन केले. खारघर पोलिसांनी (Kharghar Police) या नेपाळी दाम्पत्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल (police FIR) केला आहे.

हेही वाचा: पुन्हा निर्बंधांची धास्ती; नव्या व्हेरिएंटमुळे नियम आणखी कठोर

कुलविंदरसिंग गुरुदेवसिंग बन्सल हे व्यावसायिक खारघरमध्ये ग्रामविकास भवनजवळच्या बन्सल हाउसमध्ये कुटुंबासह राहतात. त्‍यांनी महिन्याभरापूर्वी बन्सल हाउसच्या देखभालीसाठी पृथ्वी बिनोद चंद या नेपाळी व्यक्तीला त्याच्या पत्नीसह कामाला ठेवले होते. नेपाळी दाम्‍पत्य गेटजवळ असलेल्या वॉचमनच्या केबिनमध्ये राहत होते.

त्यांना किचन नसल्याने ते बन्सल यांच्या घरातील किचनचा वापर करत होते. २५ नोव्हेंबर रोजी रात्री बन्सल यांच्या मित्राच्या मुलीचे लग्न असल्याने ते कुटुंबासह रात्री सव्वा आठच्या सुमारास अंधेरी येथे गेले होते. मात्र सुरक्षारक्षकाला जेवण बनविण्यासाठी किचन लागेल याचा विचार करून त्‍यांनी घराला कुलूप लावले नाही. न करता लग्नासाठी निघून गेले होते.

लग्न समारंभ आटोपून मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास बन्सल कुटुंबीय घरी परतले असता, प्रवेशद्वार खुले होते शिवाय घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. शिवाय कपाटातील ३ घड्याळे, पेन, सोन्याच्या अंगठ्या व चांदीचा शिक्‍का व रोख रक्कम असा सुमारे २ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे तसेच सुरक्षारक्षक व त्‍याची पत्‍नी गायब असल्‍याचे आढळले. याप्रकरणी बन्सल यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here