महाड, पुढारी ऑनलाईन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियोजित रायगड दौऱ्यावेळी President’s visit to Raigad होळीच्या माळाावर तात्पुरते हेलिपॅड करण्यास शिवभक्तांनी परवानगी दिली. महाड प्रांताधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे हेलिपॅड दौऱ्यानंतर काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. शिवप्रतिष्ठानसह अन्य संघटनांनी या हेलिपॅडला विरोध केला होता.

सहा डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर President’s visit to Raigad येणार आहेत. या भेटीवेळी ते हेलिकॉप्टरने गडावर उतरण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्याला काही शिवभक्तांनी विरोध केला होता. मात्र, आजच्या बैठकीत राष्ट्रपतींची आरोग्याची तसेच सुरक्षेचा विचार करून दिनांक सहा व सात रोजी संबंधित ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवभक्तांनी परवानगी दिली. त्यांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आले.

दोन दिवसांपूर्वी स्थानिक शिवप्रेमी शिवभक्तांनी होळीचा माळ येथे गेल्या वीस वर्षांपासून बंद असलेले हेलिपॅड पुन्हा सुरू करण्यास तीव्र विरोध केला होता. हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान, कोकणकडा व अन्य शिवप्रेमी शिवभक्त मंडळाकडून हा विरोध केला होता.

शुक्रवारी दुपारी यासंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींची सुरक्षा आणि आरोग्याबाबत माहिती दिली. चर्चेअंती संबंधित सर्व शिवप्रेमी मंडळींनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात लेखी पत्रान्वये राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीच्या माळावरील हेलिपॅड काढून टाकू, असे लेखी हमीपत्र द्यावे, अशी मागणी केली. मात्र, हे पत्र अद्याप दिलेले नाही.

होळीच्या माळावर असणाऱ्या सिंहासनाधिष्ठित छत्रपतींच्या पुतळ्याची धूळ, दगड यांच्यापासून काळजी घेण्यासाठी आवश्यक ती काळजी काचेच्या ट्यूब स्वरूपात निर्माण करून घ्यावी, अशी सूचना याप्रसंगी शिवभक्तांनी प्रशासनाला केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यास कागदी अथवा कापडी आवरण मान्य केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीसंदर्भात प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड व डीवायएसपी नीलेश तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते किल्ले रायगडावर गेल्याने संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here