रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

सरकारने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि सिगरेटची बेकायदेशीरपणे वाहतूक करणार्‍या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 7 लाख 50 हजार 400 रुपयांचे प्रतिबंधीत पदार्थ आणि त्याची वाहतूक करणारी 4 लाख 50 हजारांची टाटा कंपनीची गाडी असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार 8 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वा. चांदसुर्या बसस्टॉपजवळ करण्यात आली. (रत्नागिरी एलसीबी)

प्रशांत उर्फ बाबाजी विजय नाईक (वय 38), सुंदर लक्ष्मण कुबल (वय 42) दोघेही रा.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचे पथक बुधवारी रात्री खेडशी ते हातखंबा अशी गस्त घालत होते. तेव्हा त्यांना चांदसुर्या बसस्टॉपजवळून जाणारे टाटा इन्ट्रा (एमएच-07-एजे-1906) वाहन संशयित वाटले. (रत्नागिरी एलसीबी)

त्यानंतर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने वाहन थांबवून, त्याची तपासणी केली असता वाहनामधे विमल पान मसाल्याची 15 पोती, इतर तंबाखूची पॅकीटे आणि सिगरेटचे 33 बॉक्स असा शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल मिळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
गुरुवारी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत केली आहे.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here