पुणे : Daund Railway Station : दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांची मागणी मान्य झाली आहे. यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (Railway Minister Ashwini Vaishnav’s big decision, Daund railway station in Pune division )

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. सध्या दौंड हे स्थानक सोलापूर विभागास जोडण्यात आले होते. हे अतिशय गैरसोयीचे होते. नागरिकांच्या सोयीसाठी दौंड विभाग पुण्याला जोडण्यात आले आहे.

दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. या सर्वांची आता सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here