ज्या पत्राला आपल्या उपोषनाचा आधार बनवत गवाणकर यांनी आपल्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचे नाटक रचले, आज त्या रत्नसिंधु नगर परिसरातील ग्रामस्थांनी सरपंचांना दिलेल्या पत्रात आपल्या पत्राचे दुरुपयोग होत असल्याचे कळवले. आपला या पत्रा द्वारे त्यांनी स्पष्ट केले की त्यांची रत्नसिंधु नगर येथील कोणत्याही प्रकारच्या कामाविषयी तक्रार नाही. तसेच रत्नसिंधूनगर येथील ग्रा. मा. 325 वरील गेट शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असल्या कारणाने त्याची ही तक्रार नाही. याच बरोबर हा रस्ता ग्रामस्थांच्या वापरासाठी खुला असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
हे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले नंतर गवाणकर यांच्या उपोषणाला जोर का झटका मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
गेल्या पाच दिवसा पासून या उपोषणाला साडवली ग्रामस्थांनी पाट फिरवली आहे व फक्त बघ्यांची जास्त गर्दी असल्याची चर्चा आहे.
या उपोषणाला पाठिंबा देणारे समर्थक सुद्धा तोंडघाशी पडल्याने शिवसैनिक आनंद व्यक्त करत आहेत.