कणकवली; पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य सुत्रधारांना अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आज चांगलीच आक्रमक झाल्‍याचे दिसून आले. आज (सोमवार) सकाळी शिवसेना आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस स्टेशनवर धडक दिली.

यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन कणकवली पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

याबाबत पोलिसांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेने मुख्य सूत्रधार आमदार नितेश राणे यांना अटक करावी तसेच जिल्हा बँकेचे तळेरे येथील बेपत्ता मतदार प्रमोद वायंगणकर यांचाही शोध घेण्याची मागणी केली आहे.

हे वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here