
सिंधुदुर्ग : पुढारी ऑनलाईन
संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आज (दि. ३०) जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन फेटाळला. उद्या (दि. ३१) उच्च न्यायालयात नितेश राणेंचे वकील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे समजते.