मुंबई : Nitesh Rane Facebook post : कोकणात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने हा राडा उफाळला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. नॉटरिचेबल असणारे नितेश राणे आज सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह दिसून आले. त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. (Not Reachable BJP MLA Nitesh Rane Active on Facebook)

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत राणे गटाने मोठा विजय मिळविल्यानंतर नितेश राणे यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. गाडलाच.., असे म्हणत त्यांनी बँक विजयावर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये सतीश सावंत यांच्यावर नितेश राणे उभे असल्याचे दाखविण्यात आलेय.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकासआघाडीला धक्काम मोठा धक्का बसला. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झालेत. त्यानंतर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र, हल्ल्याचा आरोप असलेले भाजपचे मनीष दळवी विजयी झाले आहेत. सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मतं मिळालीत. मात्र, चिठ्ठीद्वारे निकाल विठ्ठल देसाई यांच्या बाजूने लागला.

संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस शोधत आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, ते पोलिसांपुढे आलेले नाहीत. ते अज्ञातस्थळी आहे. मात्र, त्यांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली.

दरम्यान, नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत पोस्टबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील बॅनरवर लिहिले आहे की, ‘भाजप आमदार नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस’. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे बॅनर कोणी लावले असेल, याची जोरदार चर्चा शहरात करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपने हे पोस्टर काढून टाकले आहे.

मुंबईच्या सायन परिसरातही भाजप आमदार नितेश राणेंबाबत आक्षेपार्ह पोस्टर्स लावण्यात आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स काढून टाकलेत. यावेळी नितेश राणे हरवले नसून मुख्यमंत्री हरवले आहेत. त्यांचे पोस्टर्स आम्ही लावू, असा इशाराही यावेळी दिला. यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सायन पोलीस स्टेशन इथे तक्रार दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा निर्विवाद विजय झाला आहे. राणे पॅनेलने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत.  महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला केवळ 8 जागा जिंकता आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here