साडवली (रत्‍नागिरी) ; पुढारी वृत्तसेवा

मुंबई-गोवा मार्गावरील बावनदी येथे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांची धडक होऊन अपघात घडला आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात आज शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातामुळे बावनदी ते निवळी व बावनदी ते वांद्री अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे. कंटेनरला हटवण्यासाठी क्रेनला देखील पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here