
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच दरम्यान तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात एका विद्यार्थ्याने दोनवेळा लस घेतल्याने एकच खळबळ उडाली. एकाच दिवशी दोनवेळा लस टोचून घेतल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. या मुलाला कामथे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याचीं प्रकृती उत्तम आहे.
तालुक्यातील विविध प्रा. आ. केंद्रात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. त्याला शाळा, महाविद्यालयातील मुलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बुधवारी दुपारी फुरुस आरोग्य केंद्रात एक मुलगा लस घेण्यासाठी गेला. मात्र, या मुलाने पहिला कोव्हॅॅक्सिनचा डोस घेतला. कोरोनावर दोनवेळा डोस घेतला जातो. एवढेच त्याच्या डोक्यात असल्याने तो पुन्हा रांगेत उभा राहिला आणि त्याने दुसर्यांदा कोवॅक्सीनची लस टोचून घेतली. मात्र, त्यानंतर वडिलांना ही बाब कळल्यानंतर तारांबळ उडाली. तत्काळ वैद्यकीय अधिकार्यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांना माहिती देण्यात आली. या नंतर खबरदारी म्हणून संबंधित मुलास कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉ. यादव यांनी ‘पुढारी’ला सांगितले. मात्र, या प्रकाराने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
हेही वाचलत का?
राज ठाकरे यांना अजामीनपात्र पकड वॉरंट ! https://t.co/72voxvqIhL #pudharinews #pudharionline #राजठाकरे
— Pudhari (@pudharionline) ६ जानेवारी २०२२