रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

येथील गोगटे जोगळेकर कॉलेज आवारात दोन भलेमोठे अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. महाविद्यालयीन कर्मचारी नामदेव सुवरे यांना कॉलेज आवारातील गटारात दोन अजगर आढळून आल्यावर त्यांनी याची माहिती सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र समीर लिंबूकर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होतं दोन्ही अजगरांना पकडून मोठ्या पोत्यात भरले. दरम्यान, कॉलेज आवारात अजगर असल्याचे कळल्यावर नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली.

सर्पमित्र या अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. सध्या कोरोना निर्बंध असल्याने कॉलेज आवारात विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा वावर कमी आहे. त्यामुळे हे अजगर गटारमार्गे भर नागरी कॉलेज वस्तीत असलेल्या कॉलेज आवारात शिरले असावेत, असे सांगण्यात आले.

हेही वाचलं का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here