
रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. सुभाष देव यांचे आज ( दि. ११ ) गोवा येथे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. राज्याच्या अभ्यास मंडळावर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पाडली आहे. राज्यपाल नियुक्त ही महत्वाची जबाबदारी आहे.
बुधवारी सकाळी त्यांच्यावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. देव यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख म्हणून देखील काही काळ यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. अनेक विषयातील व्यासंगी शिक्षणतज्ज्ञ म्हणून डॉ. देव यांच्याकडे पहिले जाते.
ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे जोडावे ? https://t.co/UuwmScoBTm #रेशनशॉप #रेशनकार्ड #ऑनलाइन #pudharinews #pudharionline
— Pudhari (@pudharionline) ११ जानेवारी २०२२