दापोली; पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक आपत्तीत आणि बदलत्या हवामानात आंबा काजू पिकांवर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता; दापोलीत पुढील काळात शेतकऱ्यांना आर्थिक सधन करेल. अशा अव्हाकॅडो Avocado या फळ पिकाच्या लागवडीचा प्रयोग दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माध्यमातून केला जात आहे, असे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दापोली येथे पत्रकारांना माहिती देताना सांगितले. दि १८ रोजी सायंकाळी दापोली कोकण कृषी विद्यापीठ येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळेस ते बोलत होते. या वेळी दापोलीचे आमदार योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय सावंत आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना कृषी मंत्री दादा भुसे
पत्रकार परिषदेत माहिती देताना कृषी मंत्री दादा भुसे

Avocadoअव्हाकॅडो-फळाला बाजारात मागणी

अव्हाकॅडो या फळात जीवनावश्यक घटक असल्याने या फळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अव्हाकॅडो याबाबत आठ ते दहा वर्ष ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यांचेशी याबाबत संवाद साधून इतर देशांमध्ये या फळांचे पीक कुठे कुठे घेतले जात आहे. याबाबत माहिती घेऊन आफ्रिकेमधून या फळाची (Avocado) रोपे आणण्याचा निर्णय कोकण कृषी विद्यापीठ यांचे माध्यमातून करण्यात आला असे, असे भुसे यांनी सांगतिले.

त्यानुसार पहिल्या टप्यात अव्हाकॅडोची  २००  रोपे असून त्यामध्ये हस आणि मालोमाची लागवड करण्यात आली आहे. त्याबरोबर काही मदरप्लान्ट देखील दक्षिण आफ्रिकेमधून आणण्यात आले आहेत. त्याबरोबर मँगोसीन, डूरीयन, रामबुटान, स्टारफुट, लोणगं असे पाच प्रकारचे वाण विद्यापीठात प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आले आहेत. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल.

विद्यापीठ कृषी पर्यटन यांचे माध्यमातून कोकण कृषी विद्यापीठात ज्या पाच परिक्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. तेथे जिल्ह्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना या उपक्रमाची माहिती घेता येईल.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here