रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने २३ आणि २४ या दोन दिवसात पाऊस पडण्याची आणि वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार रविवारी पहाटेच पावसाचा शिडकावा झाला. वारेही वेगाने वाहू लागल्याने समुद्र खवळला असून, नौका बंदरातच आश्रयाला नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसभर समुद्र चांगलाच खवळला होता. (Konkan Atmosphere) बदल्‍या वातारणामुळे आंबा बागायतदार धास्‍तावला आहे.

अशा वातावरणात मासेमारी करणे धोकादायक असल्याने परजिल्ह्यातील मासेमारी नौका आश्रयाला भगवती बंदर, मिरकरवाडा येथे दाखल झाल्या आहेत. असेच वातावरण जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सर्वत्र आहे. पुढील दोन दिवस वातावरणात बदल होणार नसल्याने मासेमारी बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

यंदाच्या मोसमात जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाला. यामुळे आंबा बागायदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. तसेच कडाक्याच्या थंडीमुळे जानेवारी महिन्यात सर्वच कलमांना चांगला मोहोर आला. यंदा आंबा पीक चांगले येईल, असे वाटत असताना निसर्गाने पुन्हा लहरीपणा दाखवल्‍याने आंबा बागायतदार धास्‍तावला आहे. . (Konkan Atmosphere)

रविवारी पहाटे जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. त्यात किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी हा पाऊस पडला. जोरदार वार्‍यामुळे मोहोराची मोठ्या प्रमाणात गळती झाली. सोमवारीही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही  वाचलं का? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here