दापोली ; पुढारी वृत्तसेवा

दापोलीत शहरातील गुरुकृपा कॉम्प्लेक्स येथील लॉटरी सेंटरला आग लागण्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दापोली एसटी स्टँड नजीक गुरुकृपा कॉम्प्लेक्स असून हा परिसर कायम गजबजलेला असतो. येथे बियर शॉपी, देशी दारू दुकान आणि लॉटरी सेंटर असल्याने या लॉटरी सेंटरमध्ये कायम ऑनलाईन लॉटरी खेळण्यासाठी कायम वर्दळ असते. आज (बुधवार) सकाळी अचानक या लॉटरी सेंटर गाळ्यातून धूर येऊ लागला. त्या नंतर येथील नागरिकांनी ही आग विझवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here