वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : एडगाव घाडीवाडी नजीक मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मनीष ट्रव्हल्सला अचानक आग लागून ट्रव्हल्स जळून खाक झाली आहे. सुदैवाने ट्रव्हल्समधल्या प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. मनीष ट्रॅव्हल्स (नं. जीए 03/डब्लू 2518) ही मुंबईहून गोव्याकडे जात होती. ट्रव्हल्स पहाटे करूळ घाट उतरुन एडगाव घाडीवाडीनजीक आली असता ट्रव्हल्सने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली. बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ येऊ लागले. व बसने मोठा पेट घेतला. (ट्रॅव्हल्सला आग)

या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात धडकताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कुडाळ व कणकवली येथून अग्नीशामक बंबना पाचरण केले. काही तासात अग्निशमन बंब दाखल झाले.आग विझवण्यात आली. मात्र ट्रव्हल्स जळून खाक झाली. घटनेनंतर एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास तळेरे कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सात वाजता अडकलेली वाहने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस करत आहेत. (ट्रॅव्हल्सला आग)

हेही वाचलत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here