
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदारीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. याच दरम्यान दोन जेसीबी अडकले असून, जेसीबी चालकांना इजा झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, परशुराम घाटात कल्याण टोल कंपनीकडून डोंगर कटाईचे काम सुरू आहे. याच दरम्यान मंगळवारी (दि. ८) रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, अद्याप त्याचे नाव समजले नाही.
यावेळी अचानक डोंगराचा मोठा भाग अचानक खाली आल्याने दोन जेसीबी मशीन अडकले आहेत. या दरडीखाली कोणी अडकल्याची भीती व्यक्त होत असून राष्ट्रीय महामार्ग व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान वाहतूक ठप्प असून दरड काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?