कुडाळ ः पुढारी वृत्तसेवा कुडाळ नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज शिवसेना-काँग्रेस पक्षाने एकत्र येत भरला. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा काँग्रेसच्या दोन्ही सदस्यांना सोबत घेत शिवसेना-काँग्रेसचा एकत्रित गट स्थापन करून नऊही सदस्यांना कुडाळमधून अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. कुडाळ नगराध्यक्षपदासाठी भाजपनेही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, काँग्रेसचे दोन नगरसेवक शिवसेनेसोबत जावून त्यांनी एकत्रित गट स्थापन केल्याने शिवसेना-काँग्रेस गटाच्या नगराध्यक्षाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. (Sindhudurg)

कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप-8, शिवसेना-7 व काँग्रेस -2 असे नगरसेवक निवडून आले आहेत. एकाही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. खरं तर शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीतील काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीपासून फारकत घेत स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरून दोन जागांवर विजय मिळविला आणि काँग्रेस किंगमेकर बनली. सहाजिकच भाजप व शिवसेनेने काँग्रेसला नगराध्यक्ष पदाकरीता सोबत येण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. राज्यपातळीवर महाविकास आघाडी असल्याने आणि महाविकास आघाडीचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील असल्यामुळे त्यांनी काँग्रेस शिवसेनेसोबतच राहणार असे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला गगनबावडा येथे ना. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना व काँग्रेसच्या प्रमुख मंडळींची बैठक झाली आणि शिवसेना-काँग्रेस यांनी एकत्र येत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. (Sindhudurg)

काँग्रेसकडून आफरीन करोल तर शिवसेनेकडून श्रेया गवंडे यांनी अर्ज दाखल केला आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी काँग्रेस व पुढील अडीच वर्षासाठी शिवसेना असा आमचा फॉर्म्युला ठरला असल्याचे आ. नाईक यांनी जाहीर केले. भाजपकडून प्राजक्ता बांदेकर यांचा अर्ज भरण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या दोन सदस्यांसह शिवसेनेने आपला एकत्रित गट स्थापन केला. त्यानंतर शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांना खबरदारीच्या दृष्टीने बाहेरगावी हलविण्यात आले. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक मात्र कुडाळमध्येच आहेत. (Sindhudurg)

हेही वाचलतं का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here