राजापूर (जि. रत्‍नागिरी),पुढारी वृत्‍तसेवा : दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव याला बंदूकीची गोळी लागून मृत्यु झाला. या प्रकरणी विजय यशवंत जाधव वय ५७ रा इंदवटी ता. लांजा या संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्‍यास राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्‍याला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.

या प्रकरणातील प्रथम संशयीत आरोपी संजय उर्फ बंडया महादेव मुगे रा. केळवडे याला विजय जाधव याने काडतूस पुरविल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. केळवडे येथे बंदूकीची गोळी लागून दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव वय ४५ याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी केळवडे गावातील संजय उर्फ बंडया महादेव मुगे याला अटक केली. या संशयीत आरोपीने पोलिसांना त्‍याच्या गुन्हयाची कबुली दिली आहे.

तसचे, मुगे याला १४ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तपासादरम्‍यान पोलीसांनी मुगे याच्याकडील बंदूक व काडतूसे जप्त केली आहेत. संशयीत आरोपीने वापरेलेली व त्याच्याकडे असलेली काडतूसे ही इंदवटी लांजा येथून विजय जाधव यांच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. जाधव याच्याकडून आपण २० काडतूसे घेतली होती. असे आरोपीने कबूल केले. त्यानंतर पोलीसांनी इंदवटी लांजा येथून विजय जाधव याला ताब्यात घेतले. आणि त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी तपास सुरू असून गावातील देवस्थानाच्या वादातुन हा प्रकार घडला आहे अशी माहिती परबकर यांनी दिली आहे. या सर्व प्रकाणाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच लाांजा उपविभागिय अधिकारी श्रीनिवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाली राजापूर पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

केळवडे येथे बंदूकीची गोळी लागून दिपक गुरव याचा मृत्यु झाल्यानंतर पोलीसांनी विनापरवाना ठासणीच्या बंदूका वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत गुरूवार पर्यंत एकूण आठ ठासणीच्या विनापरवाना बंदूका जप्त केल्या आहेत.

या सर्व संशयीत आरोपींच्या विरोधात भारतीय हत्यारबंदी कायदा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये केळवडे येथील तीन, कोदवलीतुन चार तर शिळ येथून एक अशा आठ बंदूका जप्त करण्यात आल्‍या आहेत. यापुढेही कारवाईची बडगा सुरूच राहणार आहे. आणि विनापरवाना बंदूका वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा ईशारा पोलिसांनी दिला आहे.

हे ही वाचलं का  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here