कणकवली :पुढारी वृत्तसेवा : 
आपल्या मैत्रिणीला फोन करून धमकावल्याच्या गैरसमजातून रागाने संशयित विशाल भरत भोजविया (19, रा. जानवली-रूही कॉलनी) याने त्याच्या अल्पवयीन मित्राला शिवीगाळ करत हाता-थापटाने मारहाण करून खिशातून आणलेल्या ब्लेडने डाव्या हातावर वार करून दुखापत केली. ही घटना रविवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास गणपती साना या ठिकाणी घडली. याप्रकरणी त्या अल्पवयीन युवकाच्या तक्रारीवरून विशाल भोजविया याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित विशाल भोजविया याने घटना घडली तेव्हा मद्यपान केले होते. नशेत हा प्रकार केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली. याबाबत त्या अल्पवयीन युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण कुटुंबासह कणकवलीत भाड्याने राहतो. 11 फेब्रुवारी रोजी त्याचा मित्र विशाल भोजविया याने त्याला फोन करून मैत्रिणीला धमकी दिली का? अशी विचारणा केली. तेव्हा आपण फोन केलेला नाही, तिनेच मला फोन करून जोरजोरात ओरडल्याचेे सांगितले. तेव्हा विशाल याने आपणास शिवीगाळ केली, त्यावेळी आपण त्याला आज नको उद्या बोलूया असे सांगितले.

रविवारी सायंकाळी 7.30 वा. हा विषय मिटविण्यासाठी गणपती साना येथे भेटण्याचे ठरले. त्यानुसार गणपती साना येथे आपण व मित्र सोहन पाताडे व साहिल परब हे विशालची वाट पाहत असताना विशालने तुच मैत्रिणीला फोन केलास, असे सांगून शिवीगाळ केली आणि हाताथापटाने मारण्यास सुरुवात केली. तेव्हा मित्रांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता विशालने ब्लेड काढून आपल्या डाव्या हातावर वार केला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार विशाल भोजविया याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलिस हवालदार श्रीमती एडवे करत आहेत.

हे ही वाचलं का  

वायरलेस चार्जरने कसा चार्ज होतो मोबाईल? 

जगातील सर्वात महागडे कबुतर

सिंधुदुर्ग : शिवसेनेला त्यागाची ‘कळ’.. काँग्रेसला बळ !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here