रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

फळांचा राजा म्हणून आंब्याला मानाचे स्थान आहे. आंबा आवडत नाही, अशी लोक मिळणे अशक्यच! अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आंबा आवडीचा असतो. त्यातमध्ये रत्नागिरीचा हापूस म्हणजे सर्वात उत्तम प्रतीचा आंबा. हा आंबा जगभर प्रसिदृ आहे.

कोराना महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षांत आंबा व्यापार मंदावला होता. व्यापार्‍यांचे नुकसान झाले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे यंदा आंब्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या बाजारात आंब्याची आवक पूर्णपणे सुरू झालेली नाही. खरे तर हापूस आंब्यांचा खरा हंगाम अजून सुरू झालेला नाही. पण, तरी देखील हवामानातील बदलांवर मात करत शेतकर्‍यांनी अपार मेहनत घेऊन आंबा व्यापाराचा शुभारंभ केला आहे. हंगामातील पहिला फळांचा राजा ‘हापूस’ हा मुख्य शहरातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये हळुहळू दाखल होत आहे. हंगामाचा पहिला आंबा हा व्यापारासाठीही शुभ मानला जातो. इतकेच नाही, तर परंपरेनुसार पूजेनंतरच आंब्याची विक्री केली जाते.

यामध्ये रत्नागिरीच्या एक पेटी आंब्‍याला 25 हजार रूपयांचा भाव मिळाला आहे. रत्नागिरी तालुक्यात हा प्रसिद्ध आंबा आहे. आणि ही आंबा पेटी बत्तीस शिराळ्यातील एका आंबा प्रेमीनी 25000 रुपये देऊन खरेदी केली आहे.

बागेचे उत्तम व्यवस्थापन आणि उच्च प्रतीचा हापूस बाजारात आणण्यासाठी सहा महिने कसोशीने प्रयत्न केले गेले आहे. तसेच हवामान बदलाचा परिणाम हा मोहोर आणि कैरीवर होणार नाही, यासाठी ही काळजी घेत बाजारपेठेमध्ये हापूसची पेटी लवकर आणण्यात बागायतदारास यश आले.

हे ही वाचलं का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here