कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बिबवणे येथे कारला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कलिंगड विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसून कार पलटी झाली. आज सायंकाळी झालेल्‍या दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. कलिंगड स्टाॅलसह कारचे मोठे नुकसान झाले आहे.

महामार्गावरून कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने कार भरधाव वेगात जात होती. बिबवणे येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार महामार्गालगतच्या कलिंगड विक्री करणार्‍या स्टाॅलमध्ये घुसली. यानंतर कलिंगडाच्‍या भरावावर पलटी झाली. चालकासह दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेतली.

हेही वाचलतं का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here