आरवली, पुढारी वृत्तसेवा : माखजनजवळील धामापूर येथे आंबा बागेला (Mango orchard) वणवा लागून सुमारे शंभरपेक्षा अधिक आंबा कलमे खाक झाली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आंबा बाग शिवाजी सखाराम धनावडे यांच्या मालकीची असून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

धामापूर करजुवे परिसरात वणवे लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. शिवाजी धनावडे यांच्या आंबा बागेला (Mango orchard)
गेल्या वर्षीही आग लागली होती. मंगळवारी लागलेल्या आगीत सुमारे सव्वाशे आंबा कलमे जळून खाक झाली. काही कलमांना आगीची झळ पोहचली आहे. यामध्ये शिवाजी धनावडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आंबा कलमांना मोहोर येऊन फळधारण झाली होती. महसूल विभागाला कळविल्यावर नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. जंगल भागाला वणवा लागल्याने वणव्याची आग धनावडे यांच्या बागेला (Mango orchard) लागली. सततच्या वणव्यांमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here