खेड (रत्नागिरी) : पुढारी वृत्तसेवा 
खेड (रत्नागिरी) तालुक्यातील सुकीवली व भरणे गावाच्या सीमेवर चोरद नदी पात्रात खुलेआम रुग्णवाहिकांसह इतर छोटी मोठी चारचाकी अनेक वाहने धुऊन नदीपात्र व पाणी दूषित करण्याचा संतापजनक प्रकार सुरूच आहे. त्याचवेळी याच नदीपात्रामधून तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव वाड्यांना टँकरने पिण्यासाठी पाणी पुरवठा सुरू असल्याने हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही बाब गंभीर असून मानवी जीवनास घातक रोगजंतूंचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड तालुक्यातील चोरद नदीपात्र टंचाईग्रस्त गावांसाठी राखीव पाणी साठा म्हणून प्रशासनाने या आधी जाहीर केला आहे. पाणीटंचाई काळात चोरद नदीपात्रातून लाखो लिटर पाण्याचा उपसा करत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील जनतेची तहान भागवली जात आहे. मात्र याच नदीपात्रात सर्रासपणे वाहने धुण्याचा प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सध्या तालुक्यातील दोन गावांतील तीन वाड्यांना तीन टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र या राखीव पाणीसाठ्यात अवजड वाहनांसह अनेक चारचाकी वाहने धुतली जात असल्याने नदीचे पाणी मात्र या प्रकाराने अस्वच्छ केले जात आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली
आहे.

हेही वाचलत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here