दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील पिचडोली, रेवली, दलखन या गावात (रविवार) लागलेला वनवा आजही धुमसत आहे. या वनव्यात शेकडो एकरातील शेतकऱ्यांची लागती आंबा, काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. प्रशासनाकडून या वनव्याची अद्याप दखल घेतली नसल्‍याने शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

पिचडोली सावंतवाडी इथून लागलेला वणवा, पेटत पुढे सरकला व जवळजवळ आजूबाजूचे आंबा व काजुच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वनव्यामुळे येथील सर्व गावकरी, शेतकरी व बागायतदार यांच्या झालेल्‍या नुकसानीमुळे त्‍यांना अश्रू अनावर झाले.
अजूनही रेवली गावात हा वणवा पेटत आहे. सर्व गावकरी वनवा विझविण्याचा प्रयत्‍न करत आहेत.

याबाबत बागायतदारांनी कृषी खात्यास तक्रार केली, पण त्यांनी नकार दिला आहे. कृषी विभागामार्फत फक्त नैसर्गिक आपत्ती यासाठी नुकसान भरपाई मिळते. मग वनवा हा एक नैसर्गिक आपत्तीत आहे की नाही? असा सवाल आता येथील नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्‍यान या नुकसानीची भरपाई मिळावी अशी याचना येथील शेतकरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here