
सिंधुदुर्ग पुढारी वुत्तसेवा : कुडाळ माड्याचीवाडी – खालचीवाडी येथील सौ. धनुजा ऊर्फ धनदा धोंडी गावडे (26 ) या आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह चार दिवसापासून बेपत्ता आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती धोंडी गावडे यांनी निवती पोलीस ठाण्यात रविवारी रात्री दिली.
सौ. धनुजा या 11 मार्च रोजी घरातून आपल्या सोबत मुलगी सायली (2) हिला घेऊन निघून गेल्या. आपण कुडाळ येथे डॉ.पाटील यांच्याकडे तपासणी साठी जाते, असे त्यांनी जाऊ सुस्मिता यांना सांगितले. मात्र त्यांनतर त्या घरी परतल्या नाहीत. त्यांची शोधाशोध केली. परंतु त्या रविवरी सायंकाळपर्यंत सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पती धोंडी गावडे यांनी पोलिसांत तक्रार दिली.
सौ. धनुजा यांची उंची 5 फूट, रंग गोरा, अंगात लाल रंगाचा सफेद फुले असलेला टॉप, नेसणीस क्रीम कलरचा पायजमा, पिवळसर धातूचे काळया मण्यात गोवलेले दोन पदरी मंगळसूत्र व काळ्या मण्यात गोवलेला मुहूर्तमणी कानात पिवळसर धातूचे झुलते रिंग असा पेहराव आहे.