खेड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज (मंगळवार) बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी डस्टर मोटारीने (जिजे ०५ जेएफ ०२२२) अचानक पेट घेतला.

मोटारीतून धूर येताना पाहून चालकाने प्रसंगावधान दाखवत मोटार रस्त्याच्या बाजूला उभी करून दूर अंतरावर जाऊन थांबले. मोटारीने पेट घेतल्यानंतर काही क्षणातच ती पूर्ण जळून खाक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी कशेडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी बोडकर, समिल सुर्वे यासह काही समाजिक कार्यकर्ते पोहोचले. या कारला लागलेल्या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here