रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पावस- नालेवठार येथे होळी उभारताना ती अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. चंद्रकांत नारायण सलपे (वय ५४, रा.पावस, नालेवठार धनगरवाडी, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत संदीप रामचंद्र सलपे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,चंद्रकांत सलपे हे त्यांच्या गावातील होळी उभारताना होळीच्या क्रॉसबेल्ट मधील नटबोल्ट अचानक तुटला. त्यामुळे होळी त्यांच्या अंगावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंद्रकांत सलपे यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here