
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा शहरातील भगवती किल्ल्याच्या मागील बाजूस (शनिवार) दुपारच्या सुमारास खडकात महिलेचा मृतदेह आढळून आला. रजिया मोहम्मद होडेकर (वय 65,रा.नावानगर, भाटये, रत्नागिरी ) असे महिलेचे आहे. ती गेल्या 4 दिवसांपासून घरातून बेपत्ता होती.
रजिया मोहम्मद होडेकर या गेल्या ४ दिवसांपासून घरातून बेपत्ता होत्या. याबाबत तिचा मुलगा रऊफ मोहम्मद होडेकर (44,रा.नावानगर, भाटये, रत्नागिरी ) याने शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान शनिवारी सायंकाळी एका महिलेचा मृतदेह भगवती किल्ल्याच्या मागील बाजूस सापडल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तेव्हा तो मृतदेह रजिया होडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.