दापोली, पुढारी वृत्तसेवा : दापोलीची माहिती नसणाऱ्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांना दापोलीत आणण्याचे काम सूर्याजी पिसाळ प्रवृत्तीच्या माणसाने केले आहे. आणि हेच किरीट सोमय्याचे भूत आज दापोली मुरुड येथील २६७ पर्यटन व्यावसायिकांच्या मानेवर बसले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी दिली.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  हे प्लास्टिकचा हातोडा घेऊन शेकडो कार्यकर्त्यांच्या गाड्यांसह दापोलीत येत आहेत. दापोलीत कलम १३७-१ लागू आहे, असे असताना त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. आमचा लढा हा येथील पर्यटन वाचले पाहिजे, यासाठी आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही. मात्र, कोण जर राजकीय सुडापोटी पर्यटकांच्या मुळावर उठले. तर आम्ही देखील शांत बसणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला.

दापोलीची अर्थव्यवस्था येथील पर्यटनावर अवलंबून आहे. येथील सर्व व्यावसायिक हे याच पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. असे असताना येथील सीआरझेड मुद्दा हा राजकीय सुडापोटी उपस्थित करून एक प्रकारे येथील पर्यटन व्यावसायिकांना देशोधडीला लावण्यासारखे आहे. किरीट सोमय्या यांना आमचा विरोध नाही. मात्र, त्यांनी जी पर्यटन व्यवसायाबाबत जी भूमिका घेतली आहे, त्यास आमचा कायम विरोध राहील, असे कदम यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ?

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here