
दापोली, पुढारी वृत्तसेवा : दापोली- मुरुड येथील साई रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे. आणि मी तो तोडणार, असा निर्धार करून भाजप नेते किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत दाखल होणार आहेत. आणि तिथून ते मुरुड येथे जाणार आहेत. मात्र, दापोलीत कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस सोमय्या यांना मुरुड येथे जाण्यास रोखणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
सोमय्या यांचे दापोलीत येण्याने ‘सीआरझेड’चा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे मुरुड येथील पर्यटन व्यावसायिकदेखील याबाबत आक्रमक झाले आहेत. सोमय्या यांचे मुरुड दौऱ्यामुळे काही अघटित प्रकार घडू नये, यासाठी दापोलीत पोलीस खबरदारी घेत आहेत. माजी आमदार संजय कदम हे देखील याबाबत आक्रमक आहेत. शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. दापोलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्कयान, कशेडी घाटात किरीट सोमय्या यांना पोलिसानी नोटीस दिली असली तरी त्या नोटीसीची पोहोच न देताच सोमय्या माजी खासदार निलेश राणे व आपल्या शेकडो कार्यकर्त्यासोबत दापोलीच्या दिशेने निघाले आहेत. किरीट सोमय्या यांना खेड येथे कशेडी घाटात पोलिसांनी नोटीस बजावली. किरीट सोमय्या यांनी नोटीस घेतली. परंतु, त्यावर सही केली नाही. सोमय्या ना नोटीस स्वीकारण्यासाठी पोलिसांनी विनंती देखील केली. परंतु ते नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही, असे म्हणत पुढे निघाले. दापोलीत जाण्याबाबत सोमय्या मात्र ठाम आहेत. कशेडी घाटातून खेडकडे येताना भरणेंनाका येथे काही काळ थांबून त्यांनी श्री देवी काळकाईचे दर्शन घेतले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.
हेही वाचलंत का ?