रत्नागिरीत पुढारी वृत्तसेवा: दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यासाठी मुंबईतून निघालेल्या किरीट सोमय्या यांनी आपला मुलगा नील यालाही सोबत घेतले. राजकीय आंदोलनात प्रथमच दिसल्याने राजकीय वर्तुळात नील सोमय्या यांच्या राजकारणातील लॉचिंगची चर्चा सुरू झाली आहे.

वसईतील जमिन प्रकरणी नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला. यासंदर्भात सोमय्या पिता-पुत्रांवर संजय राऊत यांनीही आरोप केला. यानंतर नील सोमय्या यांचे नाव चर्चेत आले. दापोली येथील परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कथित साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्या आक्रमक झाले असून शनिवारी मुंबईहून प्रतिमात्मक हातोडा घेवून ते दापोलीकडे निघाले.

विरोध, स्वागत हे झेलत ते अखेर दापोलीत दाखल झाले. तेथे साई रिसॉर्टवर एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर त्यांनी स्थानकाच्या पायर्‍यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा नीलही दिसून आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात नील यांच्या राजकारणातील लॉचिंगची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here