दापोली; पुढारी ऑनलाईन

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या सापडलेल्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मातोश्री कोण याची चर्चा सुरु आहे. याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी, यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवायला हवं. अफवा पसरवून बदनामी, यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे एक राजकीय षडयंत्र आहे. घाणरेडे राजकारण थांबलं पाहिजे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

यशवंत जाधव यांच्या सापडलेल्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आढळून आला आहे. यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजेच आई म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. या व्यवहाराबाबत आयकर विभागाला संशय असल्याने तपास सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाऊ. रिफायनरीमुळे पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची काळजी घेऊ. प्रकल्पासाठी जागा शोधण्याचं काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बदल्यांचं राजकारण ही आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काय म्हणाले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात| महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here