
रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : रिफायनरी विरोधात सोलगाव बारसु परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आज (बुधवारी) रस्त्यावर उतरले आहेत. रिफायनरी विरोधी समितीचे अशोक वालम, अमोल बोळे, प्रकल्प विरोधी समितीचे नेते सत्यजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. राजापूर येथील जवाहर चौकातील खर्ली नदीपात्रातून मोर्चाला सुरूवात झाली आहे.
दापोली : आमदार योगेश कदम समर्थकांचे शक्ती प्रदर्शन, घोषणा दिल्याने वातावरण तापले
जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची … एकच जिद्द रिफायनरी रद्द … रिफायनरी हटवा … कोकण वाचवा …. अशा घोषणा देत नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय आहे. हातात बॅनर घेऊन नागरिक सहभागी झाले आहेत.
हेही वाचलंत का ?