सागर आव्हाड/ पुणे : Zee 24 Taas Impact: ‘झी 24 तास’चा दणका : पुण्यातील कोयता गँगचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ कामाला लागले. कोयता गॅंगवरती सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. डीबीचे पथक चौघांना शोधण्यासाठी रवाना झाले आहे. त्यामुळे आता कोयता गॅंगवर निश्चित कारवाई होणार आहे. याप्रकरणी चौघांची चौकशी सुरु झाली आहे.

पुण्यात बालाजीनगरमधील गुंडाच्या दहशतीचे व्हिडिओ  ‘झी 24 तास’ने दाखवताच अख्खं पुणे पोलीस दल अँक्शन मोडमध्ये आले आहे. सीपी यांच्या आदेशाने पोलीस प्रशासनातील असे सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसलेत. या गुंडापैकी काहींची धरपकडही सुरू झाली तर इतरांचा कसून शोध सुरु आहे.

काय चाललंय पुण्यात... हातात कोयते घेऊन मारहाण; मुलींची, महिलांची छेड

आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या साथीदारांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. या टोळीतील काही गुंडांवर ऑलरेडी तडीपारीची कारवाई प्रस्तावित असून त्याचीही कार्यवाही देखील सुरू आहे तरीही या गुंडांना काल पुन्हा एकदा भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याने हा सगळा प्रकार समोर आलाय. या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे डीसीपी सागर पाटील यांनी म्हटले आहे.

नक्की काय होते प्रकरण?

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. स्थानिक गुंड राजरोसपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. बालाजीनगर धनकवडी परिसरात रजनी कॉर्नर येथे फुकट भाजी दिली नाही म्हणून गुंडांनी संबंधित तरुणाला मारहाण केली असून पाया पडायला लावले. तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. 

याशिवाय त्याच ठिकाणी रायडिंग करत दुचाकीस्वारांवर हल्ले केले जात आहेत. या सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या असून पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे पहायला मिळत होते. व्हिडिओमध्ये  एका अल्पवयीन मुलाला पाया पडायला लावणे, बालाजीनगर मधला आट्टल चोर दहशत करणे, धारदार हत्याराचा धाक दाखवून लोकांना आणिलहान मुलांना त्रास दिला जात होता. मुली आणि महिलांची छेडछाड करणे video काढून दहशत निर्माण करणे असे प्रकार राजरोस सुरु होते.

याबाबत परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलीस स्टेशनकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे पाहायला मिळत होते. अशा घटनांमुळे मुलांमध्ये भीती उरली नसून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना छेडणे, हत्यार दाखवणे धमकी देणे हे राजरोस सुरू होते. पोलीस आयुक्त त्याचबरोबर सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलीस चौकीत वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र पोलिसांकडून नागरिकांना कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे या गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित केला जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here