बांदा ; पुढारी वृत्तसेवा :  डिंगणे-आंबेडकरनगर येथील डिंगणेकर यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री विजेचा लोळ कोसळल्याने घराच्या छपराचे व भिंतीचे नुकसान झाले. सुदैवाने डिंगणेकर कुटुंबीय यातून बालबाल बचावले.

बांदा दशक्रोशीला मंगळवारी मुसळधार वादळी पावसाचा फटका बसला. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात डिंगणेकर कुटुंबीयांच्या घरावर अचानक वीज कोसळली. वीज छपराच्या पत्र्यातून आत भिंतीवर कोसळली. त्यामुळे काही पत्र्यांचे नुकसान झाले तर भिंतीला दोन ठिकाणी तडे गेले. वीज कोसळली त्यावेळी डिंगणेकर या आपल्या मुलासह घरात होत्या. मात्र सुदैवाने दोघेही बचावल्याने दुर्घटना टळली. सरपंच संजय डिंगणेकर, प्रदीप सावंत यांनी घटनास्थळी पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here