रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा पेटशॉप व्यवहाराची रक्कम विना परवानगी आपल्या गुगल पे अकॉउंटवर स्वीकारून डॉक्टरची सुमारे ४ लाख १२ हजार १७२ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दुकानातील दोन महिला कर्मचाऱ्यांना शहर पोलिसांनी शनिवारी अटक केली. फसवणुकीचा हा प्रकार एप्रिल 2021 ते 30 मार्च 2022 या कालावधीत घडली.

रेणुका बबन गिजे (वय 26,रा.के. सी. जैन नगर, रत्नागिरी) आणि दिशा दिनेश सुर्वे (28,रा.शांतीनगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात डॉ. अविनाश पांडुरंग भागवत (48,रा.टिळक आळी रत्नागिरी) यांनी शनिवारी पोलिसांकडे तक्रार दिली.

डॉ. भागवत यांचे साळवी स्टॉप येथे पेट्स गॅलरी नावाचे दुकान आहे. त्यामध्‍ये रेणुका  आणि दिशा कामाला होत्या. त्यांनी डॉक्टर भागवत यांची परवानगी न घेताच आपआपल्या गुगल पे अकॉउंटवर शॉपच्या व्यवहाराची रक्कम स्वीकारली.रेणुका गिजेने 2 लाख 7 हजार 93 रुपये तर दिशा सुर्वेने 2 लाख 1 हजार 279 रुपये रुपयांचा गैरव्यवहार केला.तसेच 30 मार्च रोजी सकाळी त्यांनी दुकानाच्या काउंटरमधील रोख 3 हजार 800 रुपयेही चोरून एकूण 4 लाख 12 हजार 172 रुपयांचा गैरव्यवहार केल्‍याचे फिर्यादीमध्‍ये म्‍हटलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here