रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील काही भागात पाऊस, ढगाळ वातावरण असले तरी रविवारपासून दोन दिवस कोकणातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान कोरडे राहणार असून, त्यामुळे तापामानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणातील अवकाळी सत्र काही प्रमाणात निवळले असल्याने आता कोकणातील बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे होणार असून पुन्हा उन्हाचा तडाखा बसणार आहे. कमाल तापमानात गेले तीन दिवस किंचित घट दिसून येत होती. मात्र, उत्तर-दक्षिण कोकणातील भागात पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. आगामी दिवसात तापमानात काही प्रमाणात वाढ होणार असून हवामान कोरडे होणार आहे.

कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्या नंतर सोमवार आणि मंगळवारी हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवणार आहे. त्यामुळे एप्रिलचा आगामी पंधरवडा उन्हाचा जाच वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here