रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आहेत. या नुसार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यास तपासण्यांचे प्रमाणही वाढवा अशाही सूचना आरोग्य विभागाकडून आल्याने खबरदारी घेतली जाणार आहे. रत्नागिरीत अद्यापही तशी परिस्थिती नाही. मात्र, खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचा आरोग्य विभागदेखील अलर्ट झाले आहे. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना खबरदारी घेण्यासंदर्भातील पत्रक पाठविण्यात आले आहे. संख्या वाढत असेल तर तपासण्या वाढवा, कोरोनाचा शिरकाव अधिक होवू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण नसले तरी शासनाकडून आलेल्या आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे. कोरानाची चौथ्या लाटेबाबत आता काहीही सांगू शकत नाही. शासनाच्या गाईड लाईनप्रमाणे याबाबत निर्णय घेतले जाणार असल्याचे स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here