रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस आणि हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. यामुळे हापूसच्या उत्पादनात घट होण्याबरोबर विलंबही झाला. मात्र, या अवघडलेल्या स्थितीत उत्पादनात आघाडी घेतलेल्या पायरीची चव न्यारी वाटू लागली आहे. त्यामुळे हापूसची तहान आता पायरीवर भागवली जात आहे.

हापूसच्या तुलनेत अधिक गोड आणि रसाळ असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पायरीची आवक एप्रिल महिन्यात होऊ लागली आहे. अवकाळी पावसाचे सातत्य आणि हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. हवामानाचा फटका हापूसलाही बसला असून उत्पानात घट तर झालीच आहे. त्याच बरोबर हंगमालाही उशीर झाला आहे. त्या आधी यावर्षी पायरीने नंबर लावत बाजारपेठेत आघाडी घेतली आहे. यंदाचा पाडवा हापूसविना गेल्यानंतर ग्राहकांनी पायरीचा पर्याय स्वीकारत पाडवा साजरा केला. सध्या पायरीच्या पाच ते सात डझनाच्या पेटीला (कच्चे फळ) घाऊक बाजारात 3 ते साडेतीन हजार रुपयांचा दर आहे.

रत्नागिरी हापूस आणि पायरी आंब्याच्या चवीत जमीन आसमानाची तफावत आहे हापूस प्रमाणे स्थानिक बाजारासह शहरी बाजारपेठेतही पायरीलाही मोठी मागणी असते. हापूसची आवक रोडावली असताना स्थानिक बाजारपेठेत पायरीला मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील पावस, पूर्णागड, गावखडी, आडिवरे, कशेळी, राजापूर तालुक्यातील काही भागातून पायरीची बाजारात आवक सुरू आहे. सध्या बाजारात रत्नागिरी हापूसच्या पाच ते सात हजार पेट्या बाजारपेठेकडे जात आहेत. त्या तुलनेने दरात माफक असललेल्या पायरीला पसंती दिली जात आहे. कमी आवक असल्यामुळे हापूसचे दर मात्र तेजीत आहेत. दीड हजार ते 1200 रुपयांपर्यंत हापूसच्या डझनाचा दर असताना पायरीला सहाशे ते आठशेचा दर मिळत आहे. त्यामुळे हापूस हा पायरीचा पर्याय नसला तरी सध्या तरी हापूसचीच चव स्थानिक ग्राहकांच्या आवाक्यात आहे.

पायरीला पसंती

आंब्याच्या या प्रजातीत साल पातळ असते. आमरसासाठी पायरीला मागणी असते. पायरीला घरगुती ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडूनही चांगली मागणी असते. हा आंबा कापूनच खायला हवा, असे काही नाही. तो चोखूनही त्यावर आडवा हात मारता येतो. चवीतही हापूसपेक्षा गोड आणि रसाळ आहे. सध्या हापूसची आवक कमी असताना लोकांची मागणी पायरी आंब्याची होत आहे. पसंती असल्याने पायरीला दरी चांगाल मिळत आहे.
– मोहसीन साखरकर, आंबा व्यापारी, रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here