dapoli accident www.pudhari.news

दापोली : पुढारी वृत्तसेवा

दापोली कुंभवे शिगवणवाडीतील तुषार डिके हा स्वतःच्या साखरपुड्याला जात असताना कुंभवे मराठी शाळेजवळ गतिरोधकवर आदळून त्याच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात १ ठार ६ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यातील तिघेजण गंभीर असल्याची ही माहिती मिळत आहे. हा अपघात दि. २२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला. होंडा कंपनीच्या mh-०१ah-५५०३ i आय टेन या गाडीचा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभवे शिगवण वाडीतील तुषार डिके यांचे लग्न मंडणगड तालुक्यातील पालवणी गावात ठरले होते. दि. २२ रोजी साखरपुडा होता. तर २४ रोजी लग्न होते. या साखरपुड्यासाठी तुषारचे मित्र गाडी घेऊन मुंबईतून आले होते.

साखरपुड्याला जाणारी काही मंडळी पुढे गेली होती. मागून तुषार निघाला होता. या वेळी तुषार स्वतः तुषार गाडी चालवत होता. यावेळी तू गाडी चालवू नको म्हणून अनेकांनी  तुषारला सांगितले. मात्र तुषारने गाडीचा ताबा घेतला. शिगवण वाडीपासून १ किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातावेळी गाडी दोन तीन वेळा पलटी होऊन दिशा बदलली. यात तुषार याच्या मावशीचा नवरा जागीच ठार झाला, अशी माहिती मिळत आहे.

यावेळी येथील सुतार वाडीतील, आणि कुंभवे गावातील लोकांनी मदत कार्य केले. अपघातानंतर दापोली पोलीस आणि रुग्णवाहिक दाखल झाली. या वेळी जखमींना पुढील उपचारासाठी दापोली उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. हा अपघात दापोली-खेड मार्गावर कुंभवे येथे झाला.

The post दापोली : साखरपुड्याला निघालेल्या वराच्या गाडीला अपघात, १ ठार, ६ जखमी appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here