राजापूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली वीज उपकेंद्राच्या समोर मालवाहू कंटेनर आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अल्टो कार चालक दिलीप भिकलिंग जंगम ( वय ६५, रा. कुडाळ विठ्ठलवाडी) हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांच्या पत्नी सौ. दिपाली दिलीप जंगम (५४) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. अल्टो कारचालक दिलीप जंगम हे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, ते राजापूर कोदवली वीज उपकेंद्रानजीक आले असता महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात होते. ओव्हरटेक करत निघाले असता समोरून म्हणजेच गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवर ते आदळले. यात ते जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.

या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस कर्मचारी संदीप गुरव, चालक विश्वास बाणे यांनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. तर या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here